Tuesday, December 2, 2008

प्रश्‍न

प्रतिक्रिया: 
एक प्रश्‍न असा की,
बदलून जाते विश्‍व
एक प्रश्‍न असा की,
भंगते सुंदर स्वप्न

एक प्रश्‍न असा की,
उमलते नवी अपेक्षा
एक प्रश्‍न असा की,
अनंत काळची प्रतीक्षा

एक प्रश्‍न असा की,
जणू फुलावा प्राजक्त
एक प्रश्‍न असा की,
अश्रूही बनावे रक्त

एक प्रश्‍न असा की,
तो प्रश्‍नच न राहावा
एक प्रश्‍न असा की,
उत्तरच प्रश्‍न व्हावा

6 comments:

 1. खरोखरंच.

  jayjayabhi04@rediffmail.com

  ReplyDelete
 2. jayjayabhi04, आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

  ReplyDelete
 3. 'प्रश्‍न' या कवितेला मायबोली या संकेतस्थळावरही अभिप्राय प्राप्त झाले.

  ReplyDelete
 4. खुपच छान हा प्रश्न कठीण आहे तसा सोपा ही आहे पण........

  ReplyDelete
 5. खुपच छान हा प्रश्न कठीण आहे तसा सोपा ही आहे पण........

  ReplyDelete
 6. .... पण सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळावी, असं तरी कुठे आहे?

  ReplyDelete