Monday, December 1, 2008

प्रेम

प्रतिक्रिया: 
काय असतं प्रेम म्हणजे?
दिसतं तरी कसं?
रोज नवे रंग ते
दाखवतं तरी कसं?

प्रेम म्हणजे आशा
की प्रेम म्हणजे दिशा?
प्रेमात ठेऊन चालते का
थोडीशी अपेक्षा?

प्रेम म्हणजे भक्ती
की प्रेम म्हणजे शक्ती?
प्रेमात करावीच लागते का,
दुस-यावर सक्ती?

प्रेम म्हणजे आग
की प्रेम म्हणजे राख?
कधी वावाटतं प्रेम म्हणजे
सुरावटींचा राग

प्रेम म्हणजे बहुधा
इंद्रधनूचे सप्तरंग,
शांत निळ्या जलावर
उठणारा हलकासा तरंग

प्रेम 'करता' येत नाही म्हणे,
प्रेमात 'पडावं' लागतं
प्रेम हव असेल तर,
आधी प्रेम दयावं लागतं

प्रेम म्हणजे हृदयात उठणारी
नाजूक गोड कळ,
प्रेमच देतं आयुष्याला
सावरण्याचं बळ.

असं असेल तर प्रेमापासून
दूर का रहावं?
प्रेमाचा आधार घेऊन
प्रेमच होऊन जगावं ...

20 comments:

 1. hi

  i visited first time on your blog .

  This is really one of the great work , i came across. I really liked this poem.

  mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.

  thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com

  regards

  vijay

  ReplyDelete
 2. Aapan marathi madhye pratikriya dilit he kaay kami aahe? Abhiprayasathi dhanyavaad. Aplya bloglaa avashy bhet dein.

  ReplyDelete
 3. please visit my blog @ www.akhiljoshi.wordpress.com

  ReplyDelete
 4. आपल्या ब्लॉगला अवश्य भेट देईन. ब्लॉगचा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद. माझी कविता वाचून त्यावर काही प्रतिक्रिया दिली असतीत तर आणखी आनंद झाला असता.

  ReplyDelete
 5. Chaan lihita aapan.. sweet and simple..!! baryach itar blogs varti apali hajeri asate .. seems like you are really active blogger..

  ReplyDelete
 6. धन्यवाद, जय. मी ब-याच ब्लॉगवरचे लेख वाचते आणि वाचल्यानंतर प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही.

  ReplyDelete
 7. prem hi kavitaa chan aahe .yaa kavite madhun premaa che sare rang aapan dakhavale aahet.......mast

  ReplyDelete
 8. prem hi kavitaa chan aahe .yaa kavite madhun premaa che sare rang aapan dakhavale aahet.......mast

  ReplyDelete
 9. prem hi kavitaa chan aahe .yaa kavite madhun premaa che sare rang aapan dakhavale aahet.......mast

  ReplyDelete
 10. धन्यवाद अमृत. प्रेम हे असंच असतं. खरं तर त्याला इतर कुठलंही नाव देण्यापेक्षा प्रेम हे प्रेम म्हणूनच स्विकारावं.

  ReplyDelete
 11. I visit to your blog first time yestrday.... Its really wonderful .... ani hi kavita tar farch chan aahe....

  ReplyDelete
 12. धन्यवाद पिंकी. ब्लॉगवर स्वागत आहे. इथे दीर्घकथाही आहे, ललित लेखनही आहे. ते वाचून आपला अभिप्राय अवश्य कळवा.

  ReplyDelete
 13. Hi Kanchan !!

  Mi aatch katha vachlii...... farcha chan aahe... ani ek kavita majha husbandla pathvali .....tase tumcha blog badale mala majhaya husband mule kalale .... yevadha chan kahi vachayla milel vatle navhate.... kharch far anand jala mala..... I am very happy... thanks to my husband !!!

  ReplyDelete
 14. धन्यवाद पिंकी. तुमचे पतिराज माझ्या ब्लॉगचे वाचक आहेत हे माहित नव्हतं. त्यांचं नाव मलाही कळू द्या. माझा ब्लॉग तुम्हाला आवडला यात मलाही समाधान आहे.

  ReplyDelete
 15. फार छान

  ReplyDelete
 16. असं असेल तर प्रेमापासून
  दूर का रहावं?
  प्रेमाचा आधार घेऊन
  प्रेमच होऊन जगावं ...  प्यार जिन्दगी है. लव इज लाईफ़ .

  ReplyDelete
 17. इतकी सोपी आणि साधी प्रेमाची व्याख्या आहे.

  ReplyDelete