Saturday, July 11, 2015

सुशि...एक लेखक...एक अदृश्य मित्र

प्रतिक्रिया: 
सुहास शिरवळकर हे माझे आवडते लेखक आहेत. आज त्यांचा १२ वा स्मृतीदिन. स्मृतीदिन म्हणायचं फक्त... त्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचं तर, "मी तुला विसरतच नाही, तर आठवण कशी येईल?"

वयाच्या १५ व्या वर्षी सुशिंच्या कथा वाचायला सुरूवात केली, ती अजून वाचतेच आहे. त्यांची कोणतीही कथा, कादंबरी अशी नाही ज्याची पारायणं झालेली नाहीत. सुशिंच्या कथा वाचणं हा एक निराळाच अनुभव असतो. स्थलवर्णन असो कि दोन पात्रांमधील संवाद; त्यांनी लिहिताना जपलेली ओघवती शैली यामुळे कोणतंही पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय हातातून सोडवतच नाही. मला एक गंमतीदार घटना आठवते आहे. पूर्वी आमच्या कॉलनीमधील एका लायब्ररीमध्ये एकाच डिपॉझिटवर दोन कादंबर्‍या वाचायला नेण्याची सुविधा होती. मी आणि माझ्या भावाने चार कादंबर्‍या एकाच दिवशी वाचता याव्या म्हणून दोन स्वतंत्र डिपॉझिट भरली होती. दोन मुलं घरातच असूनही घर शांत असे, ह्याचं श्रेय माझी आई सुशिंच्या कादंबर्‍यांना देते.

Saturday, May 2, 2015

विवाहांतर्गत बलात्कार

प्रतिक्रिया: 
संदर्भ:- लोकसत्तामधील ही बातमी.

मला खात्री नाही की लोकसत्ता माझी प्रतिक्रिया छापेलच. त्यामुळे हा लेखनप्रपंच. हाच लेख फेसबुकवर माझ्या टाईमलाईन वर शेअर केला आहे.

विवाहांतर्गत बलात्कार ही निश्चितपणे खेदाची व शरमेची बाब आहे. पण सगळा रोख हिंदू धर्म आणि संस्कृतीकडे का आहे, ह्याचं उत्तर मिळेल का? "हिंदू स्त्रियांना प्रत्येकी चार चार पोरे झाली पाहिजेत असे साक्षात साक्षी महाराज वदले" असं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा एक मुसलमान माणूस चार बायकांशी लग्न करून आठ मुले जन्माला घालतो हे सत्य तुम्ही नजरेआड कसं करू शकता? तिथे स्त्रीच्या हक्कांची, स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही का?

Wednesday, April 29, 2015

हसा लेको

प्रतिक्रिया: 
मागे एकदा Whatsapp संगणकावर वापरण्यासाठी चर्चा करत असताना "खुद्द Whatsapp ने अद्याप कोणतेही अॅप्लिकेशन दिलेले नाही, त्यामुळे इतर कुठल्याही app द्वारे संगणकावर Whatsapp वापरल्यास व्हायरस लागण्याची शक्यता वाढते असं मी म्हटलं होतं." त्यावर एका दीडशहाण्याने अकलेचे तारे तोडले होते की "समजा मी Whatsapp साईट विकत घेतली आणि तिथे फोनवर Whatsapp वापरता येणारा पर्याय ठेवून त्यात व्हायरस दिला, तर लोक विश्वास ठेवून ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करतीलच." वर पुन्हा स्वत:ची अक्कल किती घोड्यापुढे दाखवते हे दर्शवणारं he he he.